बाधितांच्या घरांसाठी जागा निश्‍चित

कसबा पेठेतील नागरिकांशी चर्चा सुरू – दीक्षित

पुणे – महामेट्रोच्या बुधवार पेठ येथील भुयारी मेट्रो स्थानकासाठी फडके हौदाजवळील सुमारे 200 घरे बाधित होणार आहेत, त्यांना या भागातील दादोजी कोंडदेव शाळेच्या आवारातील जागेत घरे देण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा देण्यास महापालिकेने मान्यता दिल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. या भागातील बहुतांश नागरिक जागा देण्यास तयार असून काहींच्या मनात अजूनही शंका आहेत. त्या दूर करण्यासाठी आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे दीक्षित म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या मार्गात बुधवार पेठ आणि मंडई ही दोन स्थानके असतील. त्यातील एक स्थानक कसबा पेठेत असून तेथे सुमारे 200 घरे बाधित होत आहेत. या नागरिकांना त्यांच्या सध्याएवढेच घर तसेच व्यावसायिक मिळकतींना जागा दिली जाणार आहे. ही जागा या ठिकाणाहून सुमारे 500 मीटर अंतरावरील शाळेच्या रिकाम्या जागेत दिली जाणार आहे. हे काम सुरू केले जाणार असल्याचे म्हणाले. मात्र, त्यानंतरही काही तक्रारी असून त्यांनी आंदोलनही केले आहे. ही बाब लक्षात घेऊन लवकरच जागा बाधितांचे शंका निरसन करण्यासाठी त्यांना विस्तृत स्वरूपात पुनर्वसनाची माहिती दिली जाईल. त्यानंतर त्यांची मागणी असेल, तर स्वत: बैठक घेऊन मेट्रो हा शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याने त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांना करणार असल्याचे दीक्षित म्हणाले.

स्वारगेट-कात्रज मार्ग आराखड्यासाठी आणखी 3 महिने
स्वारगेट-कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गासाठी वेगवेगळे पर्याय समोर आल्याने अंतिम आराखडा करण्यासाठी आणखी तीन महिने लागणार असल्याचे सुतोवाच दीक्षित यांनी यावेळी केले. मात्र, पिंपरी-चिंचवड ते निगडी या विस्तारित मार्गाचा आराखडा तयार झालेला असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून ही मान्यता मिळताच तातडीने केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. तर, वनाज ते शिवसृष्टीपर्यंतच्या मेट्रोबाबत अजूनही महापालिकेकडून काहीच मागणी न आल्याने या मार्गाच्या विस्ताराबाबत अजून काहीच कार्यवाही सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)