बाथरूममध्ये पेनकॅमेरा लावून महिलेचे अंघोळ करताना केले शुटींग

कराड तालुक्यातील विवाहीत महिलेच्या घरातील बाथरूम मध्ये पेनकँमेरा लावून संबधित महिलेचे अंघोळ करतानाचे शुटींग घेतल्या बद्दल गाडीवरील कामगारासह एकावर विनयभंग केल्याप्रकरणी आज उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला.संशयित आरोपीची नावे शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.देवा सदाशिव मोहिते रा.वडोली-भिकेश्वर असे आहे.याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.याला अटक केली आहे
या बाबत पीडित विवाहित महिलेने उंब्रज पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,पीडित महिलेच्या पतीचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे.या व्यवसायासाठी असलेल्या गाडीवर शंकर मोहीते हा कामगार आहे.सदरचा कामगार हा दररोज सकाळी ११ वाजता कामावर जाण्यासाठी सबंधिताच्या घरी येत असतो. दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामगार शंकर मोहीते हा पीडीतेच्या घरी आला. त्यावेळी पीडित महिला घरात एकटीच होती.या वेळी संशयित आरोपीने पीडित महिलेला विचारले की,तुम्ही अजुन आंघोळ केली नाही का? यावर पीडित महिला म्हणाली,माझा स्वयंपाक
झाल्यानंतर मी आंघोळ करणार आहे यावर तो म्हणाला मला एकाने दोन बल्ब दिले आहेत ते बाथरूम मध्ये लावू का?यावर पीडित महिलेने त्यास बल्ब लाव असे सांगितले. यानंतर संशयित आरोपी बाथरुमकडे बल्ब लावणेसाठी गेला.व माघारी आला.त्यानंतर पीडित महिला अंघोळ करणेसाठी बाथरूम मध्ये गेल्या.आंघोळ करुन त्या अंग पुसत असताना बाथरूम मधील नळाच्या पाईप कडे त्याचे लक्ष गेले.तेथे लावलेल्या वस्तूची त्याना शंका आली.त्यानी आपल्या पतीला बोलवले.त्यांना संबधित वस्तु दाखवली.त्यांनी पीडित महिलेच्या भावास फोन करून बोलावले.त्यानी ते पाहिले तेव्हा तो पेन कॅमेरा होता.त्यानी तो कॅमेरा मोबाईलला जोडुन पाहीला असता त्या मध्ये पीडित महिला आंघोळ
करतानाचे दृष्याचे चित्रण झालेले दिसले. कामगार शंकर मोहीते हा बल्ब लावतो म्हणुन बाथरुमकडे गेला असलेने त्याच्यावर सर्वांची शंका आली म्हणून सर्वानी शंकर कडे चौकशी केली असता त्याने सदरचा पेन कैमेरा लावला आहे.हे कबूल केले. तो पेनकॅमेरा त्याला देवा मोहीते याच्या सांगणेवरून वरुन त्याच्या कामगाराने दिला असल्याचे सांगितले.या फिर्यादीवरून उंब्रज पोलिसांनी संशयित आरोपी शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.याला अटक केली आहे.याबाबत उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)