बाथरुम आढळला तरुणाचा मृतदेह

सांगवी – येथील समर्थनगर परिसरात एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह राहत्या घरात बाथरुममध्ये आढळून आला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत असून, सांगवी पोलीस या दिशेने तपास करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास तौर (वय 40, रा. समर्थ नगर, नवी सांगवी, मूळ रा. गेवराई, बीड) असे मृत इसमाचे नाव आहे. कैलास तौर हे सांगवीमधील समर्थ नगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजतं आहे. दोन दिवसांपूर्वीच तौर आपली पत्नी व मुलाला बीडला सोडून आले होते. कैलास तौर यांचा पिंपरी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घरी एकटेच असलेल्या कैलास यांचा मृतदेह सकाळी दहाच्या सुमारास घरातील बाथरुममध्ये आढळून आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)