#बाणेर नागरीपतसंस्था: विश्‍वास व समाजभान जोपासणारी संस्था   

वीस वर्षापूर्वी म्हणजेच 1/9/1998 साली डॉ. दिलीप बबनराव मुरकुटे यांनी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. कष्टाने कमवलेल्या ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षेचे कोंदण देत, त्यांचा विश्‍वास संपादन करीत संस्थेने आजपर्यंत ठेवीदारांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
बेटी बचाओ, बेटी पढाओ यातून प्रेरित होऊन कुटुंबात मुलगी जन्मास आली तर तिच्या नावे 10,000/- रुपये पेन्शन, तसेच त्यांच्यासाठी 0.5 टक्‍के जादा व्याजदर, गरीब रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, जनसेवेसाठी तत्पर धावणारी रुग्णवाहिका, 10 वी, 12 वीमध्ये 80 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव सोहळा, दिवाळी म्हणजे हिंदूचा मोठा सण त्यासाठी महिलांकरिता आकर्षक सोनेकर्ज योजना राबविली जाते. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते.
आजपर्यंत या संस्थेला अनाथ बालकांच्या (माई) सिंधुताई सपकाळ, हर्षवर्धन पाटील, अण्णा हजारे, संभाजी राजेंची भूमिका करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा उपनिबंधक बी.टी. लवांड यासारख्या असंख्य मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
संस्थेच्या विविध मुदत ठेव योजना, श्री भैरवनाथ ठेव योजना अल्पावधीत लोकांच्या पसंतीस पडली आहे. पतसंस्थेचे डॉ. दिलीप मुरकुटे संस्थापक अध्यक्ष असून विजय विधाते- चेअरमन, शशिकांत दर्शने- व्हाईस चेअरमन, राजश्री मुरकुटे- शाखाध्यक्ष, दीपलक्ष्मी बेळगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 20 वर्षांची यशस्वी वाटचाल, लोकांचा विश्‍वास आणि त्यातून समाजभान जोपासणारी डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बाणेर येथे असून हिंजवडी, देहू गाव येथे शाखा कार्यरत आहेत. म्हणूनच विश्‍वास आणि समाजभान जोपासणारी बाणेर नागरी सहकारी पतसंस्था असे समिकरन रुढ झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)