बाटली बंद पाणी शुद्ध की अशुद्ध?

  • मंचर परिसरात धंदा तेजीत : शुद्ध पाणी ओळखण्याची यंत्रणाच नाही

मंचर – मंचरमध्ये छोट्या-मोठ्या व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडे दररोज हजारो लिटर बंद बाटलीचे पाणी पुरविले जाते; पण हे पाणी कितपत शुद्ध आहे, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तसेच हे पाणी शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याचे धक्कादायक वास्तवर समोर आले आहे. कोट्यवधीमध्ये उलाढाल असलेल्या आणि हजारो हातांना रोजगार देणारी ही व्यवस्था “अनियंत्रितच’ आहे.
सध्या घरापासून ते सर्व ऑफिसपर्यंत बाटली बंद पाणी पुरवठा होत असून असंख्य नागरिक हे पाणी पितात. तर रिक्षा किंवा टेम्पोमध्ये बाटली बंद जार भरून त्याची वाहतूक करतानाचे चित्र आपण दररोज रस्त्यांवर बघतो; पण हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्‍नाचे उत्तर सध्या सरकारमधील कोणत्याच यंत्रणेकडे नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बाटली बंद पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे. हे पाण्याचे जार मंगल कार्यालये, कार्पोरेट ऑफिस तसेच, छोट्या दुकानांमधून रोज भरून पोहोचवण्याची सुविधा हे व्यावसायिक देतात. रिकामे जार घ्यायचे आणि त्या जागी पाण्याने भरलेले जार ठेवायचे, अशी ही व्यवस्था आहे. यापैकी बाटली बंद पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी आहे. त्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन “स्टॅंडर्ड’चा (बीआयएस) क्रमांक त्यावर असतो. हे जार पारदर्शक असतात. मात्र, “कूल जार’ पारदर्शक नसतात. त्यामध्ये भरणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे हा खेळण्याचाच प्रकार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)