बाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही 

“परमाणू – द स्टोरी ऑफ पोखरण’नंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा रिऍलिस्टिक स्टोरीवरील सिनेमात काम करतो आहे. दिल्लीतील बाटला हाऊस एन्काऊंटरवर आधारित “बाटला हाऊस’मध्ये तो लीड रोल करतो आहे. यामध्ये त्याच्या बरोबर नोरा फतेही देखील असणार आहे. जॉन बरोबरच्याच “सत्यमेव जयते’मध्ये नोराने सुष्मिताच्या “दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये धम्माल डान्स केला होता. तिच्या परफॉर्मन्सची खूप चर्चाही झाली होती. आता जॉन आणि नोरा दोघेही “बाटला हाऊस’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

नोरा केवळ आयटम सॉंग करते असे नाही, तर तिला सिनेमाचे तांत्रिक ज्ञानही खूप चांगले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ती तिच्या रोलचे शुटिंग करणार आहे. या सिनेमासाठी तिने स्वतःच्या शब्दोच्चारावर विशेष कष्ट घेतले आहेत. त्यासाठी तिला एक वर्कशॉपही करावे लागणार आहे. दिल्लीतत जामिया नगरमध्ये 2008 साली झालेल्या या चकमकीमध्ये इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते, तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यश आले होते. या चकमकीत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. या चकमकीवरून खूप मोठा वादही निर्माण झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)