बाजार समितीच्या संचालकपदाचा लोहाडे यांचा राजीनामा

कोपरगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी मतदारसंघाचे संचालक अजित नेमीचंद लोहाडे यांनी आजारपणाचे कारण देत आपल्या संचालकपदाचा राजीनामा प्रभारी सचिव विष्णू पवार यांच्याकडे सोपवला आहे. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला असून लोहाडे यांच्या राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बाजार समितीमध्ये कोल्हे गटाचे पाच, काळे गटाचे आठ, औताडे व परजणे गटाचे प्रत्येकी दोन असे बलाबल आहे. बाजार समितीमध्ये काळे-कोल्हे-परजणे गटाची सहमती एक्‍प्रेस आहे. त्यामुळे या वर्षी सभापती म्हणून कोल्हे गटाचे संभाजी रक्ताटे तर काळे-परजणे गटाचे राजेंद्र निकोले हे उपसभापती म्हणून काम पाहत आहेत. गेल्या 29 तारखेला बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात बरेच वादविवाद चव्हाट्यावर आले. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी माहिती अधिकारात विविध माहिती मिळवून समितीच्या कारभाराची लक्तरे “सोशल मीडिया’वर टांगली. तेव्हापासून संचालक मंडळ व व्यापाऱ्यांमध्ये धुसपूस सुरू असल्याचे समजते. त्याच करणातून कांदा व्यापाऱ्यांची बैठक होऊन लोहाडे यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे. त्यावरून लोहाडे यांनी आपला राजीनामा पवार यांच्याकडे दिला आहे. आता बाजार समितीची संचालक मंडळाची बैठक 24 किंवा 25 ऑक्‍टोबर रोजी होणार असून त्यात हा राजीनामा मंजुरीसाठी संचालक मंडळापुढे ठेवला जाणार असल्याचे समजते.
याबाबत सभापती रक्ताटे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. एकीकडे शेतकरी हितासाठी बाजार समितीची स्थापना केली असताना मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे बहुतांशी निर्णय टाळण्यात येतात. भाव कमी दिला जातो, अशा वारंवार तक्रारी असतात. त्यामुळे येथील बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)