बाजार आवारातील व्यापार नियमनमुक्त करा – फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

पुणे – बाजार समितीच्या आवारातील व्यापार नियमनमुक्त करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोशियशनस ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबरोबरच जीएसटी लागू झाल्यानंतर “एक राष्ट्र, एक कर’ या संकल्पनेनुसार स्थानिक कर म्हणजेच मार्केट सेस, देखभाल आकार हे रद्द करण्यात येणार होते. मात्र, ते अद्याप सुरू आहेत. हे करही लवकरात लवकर रद्द करावेत, अशी मागणेही शहा यांनी त्या निवेदनात केली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने 25 ऑक्‍टोबर 2018 रोजी एक अध्यादेश काढला. त्याद्वारे राज्यातील व्यापार सेसमधून नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे फेडरेशन ऑफ असोशियशनस ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. ज्या प्रमाणे बाजार समितीच्या आवाराबाहेरील व्यापार नियमनमुक्त करण्यात आला आहे. त्याप्रमाणे बाजार समितीच्या आवारातील व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी फामच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती शहा यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)