बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कोलमडले अर्थाजन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला बाजारभाव मिळत नसून तरकारी बाजार भावातील सततच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे अर्थाजन कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागत असल्यामुळे भविष्यात शेती करायची की नाही हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.
तालुक्‍यात डिंभे धरणाच्या पाण्यामुळे बहुतांशी शेती ओलिताखाली आली आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरी तरकारी मालाचे उत्पादन घेण्याकडे झुकला आहे. सध्या शेतमालाचा विचार केला तर वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, गवार आदि तरकारी पिकांचे मोठ्‌या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले आहे, परंतु बाजारात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे अर्थकारण हे शेतात पिकवलेल्या शेतमालावर अवलंबून असते, परंतु गेल्या काही दिवसापासून शेतमालाला मिळत असलेला बाजारभाव पाहता शेतकरी वर्गाचे अर्थकारण कोलमडले असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतात माल पिकवण्यासाठी काबाडकष्ट करायचे. मात्र, उत्पादित मालाला बाजारपेठेत कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे भविष्यात पिकांचे उत्पादन घ्यावे की नाही? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.
दूध उत्पादक शेतकरी हवालदील
ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेला दूध व्यवसाय पूर्णतः अडचणीत आला असून पाण्याच्या एक लिटरच्या बंद बाटली पेक्षाही दूधाला कमी भाव मिळत आहे. गेल्या काही वर्षात दूध धंद्याची परिस्थिती पाहता खाजगी दूध संस्थांचे जाळे आणि दुधाचे खाजगीकरण यामुळे दूध धंद्याचे अर्थकारण पूर्णता कोलमडले आहे. दूध धंद्यावरील असणारे निर्बंध खाजगी दुध प्रकल्प संस्थांनी झुंगारले असल्यामुळे दुधाला शास्वत भाव मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाण्याच्या बंद बाटलीचा भाव प्रति लिटर 20 रुपये आणि दुधाचा भाव 17 ते 19 रूपये आहे. अशा परिस्थितीत दुधाचे महत्त्व पाण्यापेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)