बाजारपेठ सजली!

हरतालिका पूजा साहित्य खरेदीची लगबग

पुणे – हरतालिका पूजा साहित्याने सध्या बाजारपेठ गजबजली असून महात्मा फुले मंडई, शनिवारवाडा परिसर, फडके हौद, मार्केटयार्ड परिसर या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच बाजारात एकच गर्दी झालेली पहायला मिळत आहे.

हरतालिका पूजेसाठी हरतालिका 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर पूजेच्या साहित्यांत पाच फळे, पाच फळभाज्या, पूजा-पत्री सोबतच खारिक-खोबरं, बदाम, हळकुंड, बांगड्या, कापूर, धूप, विड्याची पाने, वाती, फुले, हार, नारळ, दुर्वा आदी साहित्य उपलब्ध आहे. फळांचा वाटा 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत आहे. तर फळभाज्या 20 रुपये, कापूर 10 रुपये, नारळ 20 ते 40 रुपये, तर अन्य साहित्य हे 10 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. शहरी भागातील महिलांना पत्री उपलब्ध होत नसल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या साहित्यांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे चित्र आहे. तर, पूजेसाठी नेमके कोणते साहित्य लागते, याची माहिती नसल्याने जे-जे विक्रीस आहे ते सर्व घेण्याकडे नोकरदार महिलांचा कल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)