बाजारपेठेत आवळा “तुरट’च!

पिंपरी – पिंपरी येथील फळ बाजारात गुणकारी आवळा दाखल झाला असून यंदा त्याच्या आवकेत घट झाली आहे. परतीच्या पावसाने हूल दिल्यामुळे आवळ्यांचा रसरशीतपणाही कमी झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.

नुकताच आवळ्याचा हंगाम सुरू झाला असून आवळा मार्च अखेरपर्यंत बाजारात राहणार आहे. मात्र, आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या असल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहेत. तसेच ज्या भागात आवळ्याचे उत्पादन घेतले जाते. तिकडे ही अशीच परिस्थिती असल्याने आवळ्याची आवक घटली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने गेल्यावर्षी होता तसा टवटवीतपण यंदाच्या आवळ्यात दिसत नाही. सध्या नाशिक, जळगाव, कोपरगाव, मालेगाव, अहमदनगर या भागातून पुण्याच्या बाजारात आवक होत आहे. तेथून आजूबाजूच्या शहरात विक्रेते आवळे घेऊन येत आहेत. आवक कमी असल्याने त्याचे दर 80 रूपये ते 100 रूपये किलोपर्यंत असलेले पहायला मिळत आहे.

मोठ्या आवळ्याचा वापर मुरब्बा तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे मोठ्या आवळ्याची मागणी जास्त करून कंपन्या आणि बचत गटाकडून होत असते. तसेच मध्यम आवळा खाण्यासाठी व लोणच आणि कॅंडी तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे सर्वात जास्त मागणी मध्यम आवळ्याला असते. छोट्या आवळ्याचा हंगाम उशीरा सुरू होत असल्याने मोसम सुरू व्हायला अजून डिसेंबरपर्यंत वाट पहायला लागणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)