बाजरी, ज्वारी, तुरी, हुलगा पेरणीपूर्व तयारी

खरीप पिकांची पेरणी मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर सलग 3 ते 4 दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतर (65 ते 100 मिमी) वाफसा आल्यानंतरच करावी.

ग्रामीण कृषी मोसम सेवा तथा
प्रमुख कृषी विद्या विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी.

बाजरी पेरणीपूर्व तयारी – बाजरीच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. श्रध्दा, सबुरी, फुले शांती, आदिशक्ती हे संकरित वाण किंवा धनशक्ती हे सुधारित वाण निवडावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्वारी पेरणीपूर्व तयारी – ज्वारीच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. संकरित वाण सीएसएच 9, सीएसएच 14, सीएसएच 16, सीएसएच 17, सीएसएच 18, सीएसएच 23, एसपीएच 1567, सुधारित वाण, एसपीव्ही 462, सीएसव्ही 13, सीएसव्ही 15, सीएसव्ही 17, सीएसव्ही 23. गोड वारी- एसएसव्ही 84, सीएसव्ही 19.

तुरी पेरणीपूर्व तयारी – तुरीच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. आय.सी.पी.एल. 87, विपुला, बी.एस.एम.आर.-853, बी.एस.एम.आर.- 736, वैभव या जातीचे बियाणे निवडावे.

हुलगा पेरणीपूर्व तयारी – हुलग्याच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. मान, सीना,

मूग पेरणीपूर्व तयारी – मुगाच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. जळगाव 781, एस. 8, फुले एम. 2.

सूर्यफुल पेरणीपूर्व तयारी – सूर्यफुलाच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. इ. सी. 68414, एस. एस. 56, भानू.

सोयाबीन पेरणीपूर्व तयारी – सोयाबीनच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. जे. एस. – 335, फुले कल्याणी (डी. एस.-228), जे. एस. 9305, फुले अग्रणी, फुले संगम या जातींचे बियाणे वापरावे.
कपाशी लागवड – बी. टी. कपाशीची लागवड 15 जूनपर्यंत करून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य बियाण्यांची निवड करावी. लागवड 9090 सें.मी. किंवा 12060 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी जमीन ओलवून घ्यावी. तसेच, हेक्‍टरी 10 टन शेणखत द्यावे. बी. टी. कपाशीला 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाश या प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. यापैकी 25 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
खरीप भुईमूग पेरणीपूर्व तयारी – भुईमुगाची पेरणी 15 जून ते 7 जुलैदरम्यान करावी. पेरणीसाठी एस. बी. 11, फुले प्रगती, फुले जप, फुले व्यास, टी.पी.जी. – 41, टी.जी.-26, फुले उन्नती, फुले भारती या वाणांची निवड करावी. जातीपरत्वे 100 ते 125 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेडॅझिम किंवा 3 ग्रॅम मॅकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक चोळावे. नंतर प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम रायझोबियम अधिक 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे आणि बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे. पेरणीपूर्वी 25 ते 30 गाड्या शेणखत द्यावे, तसेच पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्‍टर या प्रमाणात खते द्यावीत.

भाजीपाला रोपवाटिका पेरणीपूर्व तयारी – जिल्ह्यात ब-याच भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या शेतक-यांच्या शेतावर मशागतीची कामे चालू आहेत. कांदा, टोमॅटो, वांगी व मिरची या महत्त्वाच्या भाजीपाला पिकांची रोपवाटिकेत रोपे तयार करून नंतर पुनर्लागवड केली जाते.
*रोपवाटिका तयार करताना प्रथम 31 मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत.
*रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
*पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन 3 ग्रॅम अथवा कार्बेडाझिम 1 ग्रॅम ही बुरशीनाशके चोळून ठेवावी.
*त्यानंतर लगेच 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर व थोडेसे पाणी घेऊन ती प्रति किलो बियाण्यास सारखा थर बसेल अशी चोळावी.
*नंतर बियाणे सावलीत सुकवावे व लगेच काकरी पाडून बियाण्यांची पेरणी करावी.

कांदा पेरणीपूर्व तयारी – कांद्याच्या अधिकतम उत्पादनासाठी खालील वाणांची निवड करावी. फुले समर्थ, बसवंत 780, ऍग्री फाऊंड डार्क रेड. रोपवाटिका : 1 ते 1.5 मी रुंद, 3 मी. लांब, 20 सें.मी.चे असे गादी वाफे तयार करावेत. 1 हे. साठी 10 ते 15 गुंठे क्षेत्र पुरेसे. प्रत्येक वाफ्यात 1 घमेले चांगले कुजलेले शेणखत, 250 ग्रॅम सुफला व 50 ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड हे बुरशीनाशक चांगले मिसळून घ्यावेत. वाफा चांगला भुसभुशीत व सपाट करून घ्यावा. पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)