बाजरीची भाकरी आणि आमटीचा महाप्रसाद

नीरा नरसिंपूर- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) मगर वस्ती येथे संत सेवागिरी महाराज जयंती साजरी झाली. तुकाराम महाराजांचे वंशज हभप बापूसाहेब महाराज यांचे कीर्तन झाले. गेली 50 वर्षाच्या परंपरेनुसार बाजरीची भाकरी, आमटी असा महाप्रसादाचा कार्यक्रम येथे असतो. यावेळी पिंपरी, तण, गोंदी, बिजवडी, नरसिंहपुर, गारा, गणेशवाडी, वझरे टाकळी या भजनी मंडळांनी सेवा सादर केली. मगर कुटुंबाच्या वतीने भजनी मंडळ व बापूसाहेब महाराज यांना मानाचा नारळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तुकाराम मगर, रमेश मगर, रघुनाथ नगर, बप्पा मगर यांनी महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी हभप बापूसाहेब महाराज मळवलीकर यांच्या हस्ते प्रभातचे पत्रकार बाळासाहेब सुतार यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले. बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)