बागी 3 : बागी ‘टायगर श्राॅफ’ची अॅक्शन ट्रेनिंग सुरू, पहा व्हिडीअो…

नवी दिल्ली – बाॅलीवूडचा अॅक्शन स्टार ‘टायगर श्राॅफ’ याने आपल्य हिट फ्रँचाइजी ‘बागी’साठी मेहनत करणे सुरू केले आहे. ‘टायगर श्राॅफ’ सध्या ‘बागी 3’ सिनेमाच्या तयारीस लागला आहे. पहिल्या दोन सिनेमापेक्षा तो आगामी सिनेमात ‘खतरनाक अॅक्शन स्टंट’ करणार आहे.

टायगर श्राॅफ याला बाॅलीवूडमध्ये पाच वर्षे झाले आहेत, आणि अॅक्शन स्टार म्हणून त्याने स्वतला सिध्द केले आहे. युवा स्टारमध्ये अजून असा कोणताही स्टार नाही की जो त्याला टक्कर देऊ शकेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टायगर श्राॅफ याने ‘बागी 3’ सिनेमासाठी ‘अॅक्शन स्टंटची’ ट्रेनिंग सुरू केली असली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार निर्माता अजून सिनेमासाठी अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. मागील दोन सिनेमाच्या भागात श्रध्दा कपूर आणि दिशा पटानी यांनी अभिनेत्री म्हणून काम केले होते.

टायगर श्राॅफ हा ‘बागी 3’ सिनेमातील ‘अॅक्शन स्टंट’ शिकण्यासाठी कठिण अशी ट्रेनिंग घेत असून त्यासाठी सराव करत आहे. याचा व्हिडीओ देखील त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

बागी 3 या सिनेमातील स्टंटच्या प्रशिक्षणामध्ये एम 16, एटी 4 आणि राॅकेट लांचर अशा हत्यारांचा वापर कसा करावा, याचा या प्रशिक्षणात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/Bo6JZoCHqI6/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)