टायगर श्रॉफ ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमामध्ये व्यस्त झाला आहे. मात्र काही आठवड्यांपूर्वी रीलिज झालेला टायगर आणि दिशापटनीचा ‘ बागी 2’ हा सिनेमा बॉक्सऑफिसवर मात्र अजूनही दमदार कामगिरी करत  आहे.   दिशा पटणी आणि टायगर श्रॉफ ही नवी जोडी, टायगरचा चित्रपटातील  धमाकेदार अंदाज यामुळे ‘बागी 2’ चित्रपटाने अवघ्या 5-6 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला होता. मात्र आता या चित्रपटाने 200 कोटींचाही टप्पा पार केला आहे.

30 मार्चला रीलिज झालेल्या ‘बागी 2’ चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यामध्ये सुमारे 200 कोटींची कमाई केली आहे. यंदा ‘पद्मावत’नंतर दमदार ओपनिंग मिळवणारा हा सिनेमा ठरला आहे.  ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, देशभरात या चित्रपटाने 232.06 कोटींचीकमाई केली आहे. भारतामध्ये या चित्रपटाने 148.45 कोटींचा गल्ला कमावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)