बागायती भागातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जिल्हा प्रशासनाची उद्या बैठक : 18 वर्षात 692 शेतकऱ्यांपैकी 360 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत

नगर: जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. यावर्षी, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे 87 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचे कुटुंब सरकारी मदतीसाठीच्या निकषात बसले आहे आणि त्यांनाच आर्थिक मदत मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिरायती भागाबरोबरच बागायती भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. तीन वर्षांत शेतीचे अर्थकारण बिघडले असल्याने आत्महत्या वाढू लागल्या असल्याचे दिसते. वर्ष 2015 मध्ये 118 शेतकऱ्यांनी, 2016 मध्ये 144 शेतकऱ्यांनी तर 2017 मध्ये 140 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. यंदाच्या वर्षी 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा आत्महत्येचे सत्र थांबले नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बारा, ऑक्‍टोबर महिन्यात आठ, नोव्हेंबर महिन्यात आठ आणि डिसेंबर महिन्यात दहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करते. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आत्महत्या झालेल्या 38 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे. तर, 33 जणांचे कुटुंबीय मदतीपासून अपात्र ठरविण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्याच्या 16 प्रस्तावावर अद्याप निर्णय बाकी असून त्यासाठी दोन जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, वर्ष 2001 ते 2018 याकाळात जिल्ह्यात एकूण 692 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु, त्यातील निकषात बसणाऱ्या 360 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)