बाइक अॅम्ब्युलन्सच्या ताफ्यात वाढ

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाइक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आणखी २० मोटार बाइकचा समावेश करण्यात आला आहे. मोटर बाइक अॅम्ब्युलन्स सेवा २ ऑगस्ट २०१७ पासून सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत १० बाइक होत्या. यात आता आणखी २० बाइकची भर पडली आहे.

या बाइक मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर, नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत. १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाइक ॲम्ब्युलन्स तत्काळ उपलब्ध होऊन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)