बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा ठिय्या

सातारा – जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विवि मागण्यां केल्या. सरकारने कामगारांना हक्काच्या घरासाठी पाच लाख रूपये अनुदान द्यावे, वयाच्या 55 व्या वर्षानंतर निवृत्ती वेतन 5 हजार रूपये देण्यात यावेत, साहित्य खरेदीचे पाच हजार रूपये तात्काळ मिळावेत, मागील दोन वर्षाची थकीत शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी

तसेच कामगार मंडळाकडून ओळखपत्र देण्यात यावे, मंडळासाठी सेस कर रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करून कामगार कल्याण मंडळात आर्थिक भर घालण्यात यावी, नोंदणी करताना अशिक्षित कामगारांना अपमानास्पद वागणूक देण्यात येवू नये, बांधकामावेळी साहित्य कमी पडल्यास त्या दिवशीचा अडीचशे रूपये बेरोजगार भत्ता देण्यात यावा, त्याचबरोबर 35 किलो रेशनिंग साहित्य मिळावे, बांधकाम कामगारांनी केलेल्या कामाच्या रक्कमा बुडविण्याच्या घटना घडतात अशावेळी कामगार सह.आयुक्तांनी हस्तक्षेप करून ती रक्कम वसूल देण्यासह कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करावेत तसेच बांधकाम कामगार मंडळासाठी स्वतंत्र व पुर्ण वेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)