बांधकाम विभागाला आले शहाणपण

पसरणी घाटातील धोकादायक दरडी हटविल्या
वाई, दि. 30 (प्रतिनिधी) – पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांना जोडणारा पसरणी घाट हा मुख्य दुवा आहे. पसरणी घाटातून मोठ्या प्रमाणावर वहातुकीची रहदारी असते. परंतु पाऊसाचे दिवस आले की दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. यामुळे पर्यटकांना व पाचगणी, महाबळेश्वरला जणारया-येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास सोळा नंबरच्यावर दत्त मंदिर परिसरात धोकादायक स्थितीत असलेली दरड पाडली. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने धोकादायक कडे-कपाऱ्यादेखील जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. तीन तास सुरु असलेल्या या कामामुळे काही काळ वाहतूक खोळंबली मात्र, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पाचगणीतून करहर मार्गे काही प्रमाणात वाहतूक वळविण्यात आली. दरम्यान, दुपारी 12 वाजल्यापासून सुरु करण्यात आलेले हे काम तीन वाजता बंद करण्यात आले.
मात्र पाचगणी-महाबळेश्‍वरकडे जाणाऱ्या पर्यटकांना काम होईपर्यंत अडकून पडावे लागले. सुमारे तीन तास घाट बंद केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान पावसाच्या दिवसात कोणत्याही धोका होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाययोजना म्हणून मोहीम हाती घेतल्याची माहिती उपविभागीय बाधकाम अधिकारी के. पी. मिरजकर यांनी दिली. धोकादायक दरड हटविण्यासाठी जेसीबी, ट्रॅंक्‍टर, डंपर इत्यादी इत्यादी सह बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)