बांधकाम विभागाने केले शहरात मोजमाप

जामखेड – जामखेड शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणाने नगररोड व बीड रोडवरील अतिक्रमणे 7 दिवसात हटविण्या संबंधित निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यास सुरवात करून शहरातील बीड रोड , नगर रोड रस्त्यापासून पन्नास फूट अंतर निश्‍चत करून आज शहरातील विविध ठिकाणी मोजमाप करून बॉर्डर आखण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमणाच्या कचाट्यात सापडलेले जामखेड शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रशासन व नागरीकांच्या बैठकीत शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणाने नगररोड व बीड रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्या संबंधित निर्णय झाला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषदेच्या अधिका-यांमध्ये समन्वय नसल्याच्या कारणाने एकाच दिवसात अतिक्रमण मोहीम बारगळली होती. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात यावीत या अनुषंगाने शहरातील उर्वरित अतिक्रमणे काढण्या बाबत (दि.26) रोजी तहसीलदार विशाल नाईकवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी, महावितरणाचे गावीत जिव्हाळा फाऊंडेशनचे पदाधिकरी यांच्या प्रमुख उपस्थित बैठक होऊन 7 दिवसात शहरातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला .
तसेच जशा गरीबांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे सरसकट अतिक्रमणे काढण्यात यावीत तसेच नगररोड येथील रस्त्याच्या मध्यभागा पासून पन्नास फुट अंतरापर्यंत तर बीड रोडवरील रस्त्याचे आंतर हे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवुन दिलेल्या अंतापर्यंत आखुन दिलेल्या रेषे पर्यंत ही अतिक्रमणे काढण्यात येतील असा निर्णय झाला.
तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे महावितरण विभागाचे विद्युत पोल देखील हटविण्यात येतील. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी यांनी सांगितल. होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील बीड रोड ,नगर रोड वरील आपल्या हद्दीतील रस्त्याच्या मध्यांकपासून पन्नास फुटाची अतिक्रमित जागा निश्‍चित करून बॉर्डर आखण्यात आली. अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या सात दिवससात नगररोड व बीड रोडवरील अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. जर त्यांनी आपले अतिक्रमण काढले नाही तर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)