बांधकाम विभागात “खाबुगिरी’

राहूल कलाटे यांचा हल्लाबोल : संबंधितांवर कारवाई करा

पिंपरी – शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल, तर बीट निरीक्षक बांधकाम मालकाला महापालिकेत बोलवतात, पैसे घेऊन कारवाई टाळतात. या सर्व धक्कादायक प्रकाराचे पुरावे अर्थात “व्हीडिओ क्‍लिप’ माझ्याकडे आहेत. अधिकारी पैसे खातात मात्र नगरसेवक बदनाम होतात, त्यामुळे बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महासभेत केली.

-Ads-

शुक्रवारी झालेल्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. राहुल कलाटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. तरीही राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या कृपाआशिर्वादाने ही बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम शहरात सुरू असेल तर बीट निरीक्षक तिथे जाऊन पैशाची मागणी करतो.

पालिकेत बोलवून घेतो. बांधकाम मालकाकडून पैसे घेऊन ती कारवाई टाळली जाते. सर्रासपणे असा प्रकार महापालिका मुख्यालयात सुरू आहे. बांधकाम परवानगी विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करा. नगररचना विभागातही तसाच गलथान कारभार सुरू आहे. नगरसेवक तिथे गेले की फाईली लपवल्या जातात. पैसे अधिकारी खातात, मात्र नगरसेवक बदनाम होतात शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह सर्वांचीच सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कलाटे यांनी केली.

कोण काय म्हणाले?
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, अधिकारी पैसे घेत असतील तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजप पारदर्शक कारभार करत आहे. अशा प्रकाराला नक्कीच पाठिशी घालणार नाही. मंगला कदम म्हणाल्या की, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना पुराव्यासह राहुल कलाटे यांनी समोर आणली आहे. आयुक्तांचा या प्रकारावर वॉच असला पाहिजे. महापौर काळजे म्हणाले की, बीट निरीक्षक पैसे घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देत असतील तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. आयुक्‍तांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)