बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करू- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: राज्यातील सार्वजनिक  बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केला.
चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधन संच संवेदना फौंडेशनच्यावतीने जिल्ह्याती जिल्हा परिषद शाळांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या चार वर्षात रस्ते विकासावर अधिक भर देऊन अधिक दर्जेदार रस्त्यांची उभारणी केली आहे.येत्या मार्चनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील एकही रस्ता दुरूस्तीसाठी शिल्लक राहणार नाही. अशी व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. हीच भूमिका डोळ्यासमोर ठेऊन राज्यशासनाने गेल्या चार वर्षात विकासाची कित्येक कामे हाती घेऊन पूर्ण केली आहेत.दर्जेदार विकासाव्दारे सामान्य माणसाला सुखी आणि समाधानी करण्यावर शासनाचा अधिक भर असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)