बांधकाम भवन इमारतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भुमीपूजन

कोल्हापूर – सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आवारातल्या 4 कोटी 30 लाखाच्या बांधकाम भवन इमारतीचे भुमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास  खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश  क्षीरसागर, अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाईसंदीप देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे

प्रभारी वास्तु शास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार उत्तम दिघे,  उप अभियंता बी.एस.उगले  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन बांधकाम भवन प्रकल्पाची माहिती दिली. या समारंभास अनेक मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)