बांधकाम ठेकेदारास हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा

वाकी- बांधकाम ठेकेदारास हप्ता मागितल्या प्रकरणी महेश बबन कड व बिपीन मच्छिंद्र कड (दोघेही रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयूर उत्तम खांडेभराड (वय 24, रा. कडाचीवाडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कडाचीवाडी (ता. खेड) येथील गट नं.9 मधील खांडेभराड यांच्या विहिरीचे पाणी शेतीसह मेदनकरवाडी (ता. खेड) येथील तुलीप होम्स बिल्डींगचा ठेकेदार सुरेश पटेल यांचे नवीन बांधकामावर गेल्या सहा महिन्यांपासून पाइपलाईनच्या माध्यमातून दिले जाते. या मोबदल्यात पटेल हे खांडेभराड यांना 40 हजार रुपये देतात. हे पाणी बांधकामावर टाकायचे असेल तर तू आम्हालाही प्रतिमहिना 25 हजार रुपये हप्ता दिला पाहिजे. हप्ता देण्यास टाळाटाळ केली, तर तुला जीवे ठार मारू, अशी धमकी देत महेश व बिपीन कड यांनी मेदनकरवाडी येथील बांधकामावरील नळ्यांचीही मोडतोड केली. कडाचीवाडी येथे दि. 12 मार्चला रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. त्यानंतर वारंवार होत असलेल्या या त्रासाला वैतागून खांडेभराड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली, त्यानुसार महेश कड व बिपीन कड या दोघांवर शनिवारी (दि. 24) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)