बांधकाम क्षेत्र पुनरूज्जीवित होण्याची शक्‍यता 

संग्रहित छायाचित्र

बांधकामाशी निगडीत उपकरणांची मागणी वाढणार 
मुंबई – बांधकाम व शहरविकास क्षेत्राशी निगडित कॉंक्रिट शो इंडिया या प्रदर्शनाच्या सहाव्या सत्राची घोषणा यूबीएम इंडियाने तर्फे करण्यात आली आहे. हे प्रदर्शन मुंबईतल्या गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेन्शन ऍण्ड एक्‍झिबिशन सेंटर येथे 24 ते 26 मे 2018 या कालावधीत पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, यांसारख्या महत्त्वाच्या संघटना व संस्थांकडून सदर इव्हेंटला सहाय्य लाभले आहे. यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले, 2018-19 च्या अर्थसंकल्पात शहरविकास क्षेत्रासाठी सरकारने बरेच आर्थिक प्रोत्साहन देऊ केले आहे. किफायतशीर गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खास किफायतशीर घरांसाठी गृहवित्त सुविधा (एएचएफ) नॅशनल हाऊसिंग बॅंकेतर्फे या देण्यात आली आहे. या मोहिमेमुळे सदर क्षेत्रातील भागीदारांच्या क्षमता वाढल्या आहेत. रस्ते, रेल्वे इथपासून ते विमानतळे व स्मार्ट शहरांतील अन्य उपक्रमांपर्यंत या उद्योगक्षेत्राची भरभराट झाली आहे.

सरकारने बांधकाम उपकरणांवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍क्‍यांवर आणल्यामुळे, गेल्या काही महिन्यात भारतीय बाजारपेठेत या उपकरणांची मागणीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, कॉंक्रिट शो इंडियामुळे कॉंक्रिट बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध होतील. कॉंक्रिट शो इंडिया (सीएसआय)मध्ये कॉंक्रिट आणि बांधकाम, बांधकाम उपकरणे, बांधकामासाठीची रसायने, व्यापार व उद्योगक्षेत्रातील फ्लोअरिंग आणि मोबाईल बांधकाम टूल्स मांडण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, सरकारी व नागरी शहरविकास, विशेष स्थापत्यविषारद, सल्लागार व कंत्राटदार तसेच, विकसक या क्षेत्रातील मंडळींना परस्परांशी संवाद साधण्याची संधी या तीन दिवसीय शोमधून मिळणार आहे.
प्रदर्शनादरम्यान कॉंक्रिटवर आधारित भारतातील आधुनिक इन्फ्रास्ट्रक्‍चर या थीमवर आधारित दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या तांत्रिक परिषदेत बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्‍चर तंत्रज्ञान, त्यांतील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया व अमलबजावणी या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)