बांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय

File pic

6 महिन्यांत 404 कोटींचे उत्पन्न : गतवर्षीच्या तुलनेत उतपन्न 200 कोटींनी वाढले

पुणे – बांधकाम क्षेत्रावरील मंदीचे सावट दूर होत असल्याने महापालिकेच्या बांधकाम शुल्कात सुरू असलेली उत्पन्नाची घट यंदा कमी झाली असून मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा महापालिकेस 200 कोटी रुपायांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानग्यांमधून एप्रिल ते सप्टेंबर 2018 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 404 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी 2017-18 च्या पाहिल्या सहा महिन्यांत 196 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील मंदी, त्यानंतर आलेली नोटबंदी आणि जीएसटी तसेच राज्य शासनाकडून बांधकाम क्षेत्रासाठी लागू केलेला रेरा आणि विविध नियमांमुळे परवानगीचे प्रस्ताव कमी झाल्याने पालिकेचे उत्पन्नही घटल्याचा दावा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात होता. बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदाजपत्रकाच्या पहिल्या सहा महिन्यांत 2016-17 मध्ये बांधकाम विभागास 265 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2017-18 मध्ये त्यात 70 कोटींची घट होत हे उत्पन्न 195 कोटींवर आले. त्यात यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत लक्षणीय वाढ झाली असून सप्टेंबर 2018 अखेर पालिकेच्या तिजोरीत बांधकाम विभागास 404 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प मान्यतेसाठी आल्याचे स्पष्ट होत आहे.

 

अंदाजपत्रकातील उद्दीष्ट यंदा गाठणार
महापालिकेच्या बांधकाम विभागास शहरात दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्यांच्या शुल्कापोटी 2017-18 च्या अंदाजपत्रकात 800 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास जेमतेम 450 कोटींपर्यंतच मजल मारता आलेली आहे. त्यामुळे या विभागास या वर्षीही उत्पन्नाचे उद्दीष्ट 750 कोटींच्या आसपास देण्यात आले आहे. पहिल्या सहा महिन्यांतच बांधकाम विभागास 50 टक्‍के पेक्षाही अधिक उत्पन्न मिळाले असल्याने यावर्षी हा विभाग उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)