बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा प्रयत्न

नगर – बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सभासदांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी देशभरातून विविध तज्ज्ञांना नगरमध्ये बोलावून सभासदांना मार्गदर्शन केले जाते. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपकम ही शहरामध्ये मोठ्या उत्साहात केले आहेत. यामध्ये नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला आहे. नगर शहराच्या विकासासाठी संघटनेचे योगदान लाभावे, यासाठी आम्ही काम करीत आहोत. या संस्थेने अनेक सामाजिक उपकम केल्याने संस्थेचा राज्यात नावलौकिक पोहोचला आहे, असे प्रतिपादन आर्किटेक्‍टस, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असो.चे अध्यक्ष सुरेश परदेशी यांनी केले.

आर्किटेक्‍टस, इंजिनिअर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असो.च्या वतीने प्रीकॉस्ट सिमेंट कॉंकिट व व्हॅल्युएशनवर आधारित तांत्रिक सेमिनारचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुरेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बी. सुरेश, अविनाश कुलकर्णी, अमोल कौठालकर, प्रमोद कांबळे, मुजावर, मकरंद देशपांडे, रमेश कार्ले, प्रफुल्ल सुराणा, अनिल आठरे, अनिल मुरकुटे, सुनील जाधव, प्रीतम मुथा, बाबू ससाणे, अन्वर शेख, रवींद्र मुळे, प्रशांत आढाव, रवींद्र खर्डे, नंदू बेरड, अजय लालबागे, आदिनाथ दहिफळे, विष्णू कुमावत, रत्नाकर कुलकर्णी, सलीम शेख, अशोक मवाळ, अनिल धोकरिया, नंदकिशोर घोडके आदी उपस्थित होते.
चेन्नई येथील बी. सुरेश यांनी प्रिस्टेस्ड सिमेंट कॉंकिट या विषयावर टेक्‍निकल प्रेझेंटेशन केले. यामध्ये त्यांनी चेन्नईमधील 14 कि.मी. लांबीच्या मेट्‍रो रेल्वेसाठीच्या जमिनीखालील रेल्वे टनेलिंगच्या बांधकामाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. खोदकामासाठीचे बोअरिंग मशिनरी तंत्रज्ञान व टेनलमधील सर्क्‍युलार प्रिकास्ट कॉंकिट वॉलच्या बांधकाम विषयावर त्यांनी अधिक प्रकाश टाकला.

अविनाश कुलकर्णी यांनी व्हॅल्युएशन या विषयावर टेक्‍निकल प्रेझेंटेशन सादर केले. यामध्ये त्यांनी रेट व्हॅल्युएशन, स्टॅंडर्ड रेंट टाकून व मेसर्ने प्रॉफीट या विषयावर अधिक प्रकाश टाकला. आभार रमेश कार्ले यांनी मानले. हा कार्यकम चेट्टीनाड सिमेंट वितरक सहयोगाने संपन्न झाला. कार्यकमासाठी प्रदीप तांदळे व प्रफु सुराणा यांनी परिश्रम घेतले. चेट्टीनाड कंपनीच्या वतीने सिमेंटबाबत विशेष सखोल माहिती देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)