बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा!

पिंपरी – कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने शहरातील कष्टकरी महिला -पुरुष कामगारांची विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात आली. यात सुमारे 1500 कामगारांचे अर्ज भरून नोंदणी करण्यात आली. महासंघाच्या या कार्याचे निलंगेकर -पाटील यांनी कौतुक केले. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले.

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व राज्य मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून एक महिन्याचे विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले. त्यामुळे अधिकाधिक कामगारांना लाभ घेता येणार आहे. दुर्दैवाने कामगाराचा काम करताना मृत्यू झाल्यास ठेकेदार अथवा मालक नुकसान भरपाई देत नाही अशा वेळी या नोंदीत कामगारांना अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख नुकसान भरपाई मिळते. मात्र अनेक कामगारांनी नोंदणी न केल्यामुळे ते वंचित रहातात. कायम स्थलांतर होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्मा झाला आहे. कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आज़ारपणाचा विमा, घरासाठी तरतूद असे अनेक लाभ नोंदीत कामगारांना मिळणार आहेत.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथील कार्यालयात मोफत फॉर्म भरून योग्य मार्गदर्शन केले जात आहे, याचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक एकनाथ पवार, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, अंजना गुंड, तानाजी साळुंके, रामा बिरादार, धर्मेंद्र पवार व कामगार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)