बांधकाम कामगारांना “सुरक्षा कवच’

भोसरी – सुरक्षा साधनांअभावी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे बांधकाम कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने पुढाकार घेतला आहे. 1250 बांधकाम कामगारांना सेफ्टी किटचे वाटप करत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देखील देण्यात आला.

भोसरीतील क्वालिटी सर्कल सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आबा लांडगे, युवराज कोकाटे, संघटनेचे उपाध्यक्ष किसन बावकर, भिवाजी वाटेकर, युवा सेनेचे परशुराम आल्हाट, सचिन सानप, मारुती कौदरे, आबा मांढरे, रवी घोडेकर, प्रदीप धामणकर, बांधकाम विभागाच्या जिल्हा अध्यक्षा उज्ज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, महेश हुलावळे आदी उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्यात शंकर फुलारी यास साठ हजार रुपये, निशा इंगळे हिला दहा हजार रुपये, प्रेरणा इंगळे हिला अकरा हजार आणि अभिषेक येळे यास वीस हजार आणि सुजाता पुजारी हिला अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इरफान सय्यद म्हणाले, स्मार्ट सिटीचा दर्जा उंचविण्याचे काम असंघटीत बांधकाम कामगार करत आहेत. कामगार सर्वांना घरे, इमारती बांधून देत आहेत. परंतु, याच कामगारांना हक्काचे घर नव्हते. कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच कामगारांना स्वत:चे घर देण्याची घोषणा केली आहे. शहरी भागातील कामगाराला घरासाठी साडेचार लाखाचा तर ग्रामीण भागातील कामगाराला दीड लाखाचा निधी भेटणार आहे. आतापर्यंत जवळजवळ हजारो कामगारांना संघटीत करण्याचे काम महाराष्ट्र मजदूर संघटनेने केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत असताना शासन दरबारी मागण्या मांडणार असल्याचे इरफान सय्यद यांनी सांगितले.

सुरक्षा किटमध्ये कामगारांना प्रोटेक्‍टिव्ह शुज, मास्क, इअरिंग, हेल्मेट, सेफ्टी हॅंड हॉनेश, रिफ्लेक्‍टिव्ह जॅकेट तसेच प्लॅस्टिक चडई, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी अशा सुमारे अकरा हजार रुपये किंमतीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकी कामगारांना पाच हजार रुपये व सुरक्षा रक्षक संच देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश वनवटे, चंदन वाघमारे, अनिल खपके, साई धोत्रे, ओंकार माने, समर्थ नाइकवडे यांनी परिश्रम घेतले.

हक्काचा नाका द्या अन्यथा मोर्चा – इरफान सय्यद
शहरातील बांधकाम कामगारांना हक्काचा कामगार नाका देण्यात यावा. अन्यथा सर्वात मोठा मोर्चा महापालिकेवर काढला जाईल, असा इशारा इरफान सय्यद यांनी दिला. बांधकाम कामगार संघटीत झाल्याने अठरापगड जातीचे बलुतेदार ही एकत्रित आले आहे. सरकारची कामगारांविषयी भूमिका ही हिताची जरी नसली तरी शासनाच्या विविध योजनांमुळे मजुराला हक्क प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने शासन दरबारी पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)