बांधकाम कामगारांना घरासाठी दोन लाखांचे अर्थ सहाय्य

 

पिंपरी – बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी बांधकाम कामगार सेनेची होती. दोन लाखांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यास राज्य सरकारकडून मान्यता दिली आहे. बांधकाम कामगार सेनेच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी केला आहे.

-Ads-

देशात 1996 साली बांधकाम कामगारांसाठी कायदा झाला. त्यानंतर 2007 साली राज्यात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली. बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नांसाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने 2013 साली इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत घर बांधणी व दुरुस्तीसाठी 2 लाखांपर्यंत अर्थ सहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य विमा योजना अशा विविध कल्याणकारी योजना मंडळाने जाहीर केल्या. मंडळने या योजनांच्या जाहिरातीकरिता कोट्यवधी रुपये खर्च केले.

बांधकाम कामगार सेनेने या योजनांचे 60 अर्ज 2013 साली पुणे जिल्हा कामगार उपायुक्‍त कार्यालयात जमा केले. मात्र, ही योजना राबवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी मंडळाकडे असणारे अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणा नसल्याने घर बांधणी व दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य ही योजना एकही लाभ न देता गुंडाळण्यात आली. पुढच्या वर्षी आरोग्य विमा योजनाही बंद करण्यात आली.

त्याविरुद्ध बांधकाम कामगार सेनेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. गृह कर्जावरील व्याजाची रक्कम मंडळामार्फत देण्यात येईल. नोंदीत पात्र कामगारांच्या घर खरेदी किंवा बांधणी करिता सहा लाख रुपये अथवा त्या वरील व्याज जास्तीत जास्त 10 वर्षाच्या कालावधीत परतफेड करण्याच्या करारावर मंजूर केले असेल, तर वर्ष निहाय व्याज बॅंकेस मंडळ अदा केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे संस्थेने स्वागत केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)