बांधकाम कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ

पिंपरी – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दीड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याची सुरुवात आज (बुधवार) वाकड येथील अक्रोपॉलिस या साईटवर आरोग्य शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.

मिलिनीयम डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुकरेजा यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक वैभव गायकवाड, सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, दीपक म्हेत्रे व प्रकल्प व्यवस्थापक गोविंद कुमार आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या सहाय्याने लोकमान्य रुग्णालय, स्टार रुग्णालय व औध जिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला. यावेळी दिवसभरात लहान बालक, महिला व पुरुष कामगार अशा 270 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकमान्य रुग्णालयाचे सर्जन डॉ. निलेश आगवेकर, सहदेव गोळे, राजु वायकर, रविंद्र गुरव, योगेश ढंगारे, स्टार रुग्णालयाच्या डॉ. वर्षा पाटील, रोहीत लांडगे, माही चव्हाण, विभा सोनकांबळे, जया कांबळे आदींनी संयोजनात पुढाकार घेतला.

विमा योजनेत जनआरोग्याचा समावेश
सन 2015 पासून सुरू असलेली विमा योजना रिनिव्हलचा वार्षिक हप्ता न भरल्यामुळे बंद करण्यात आली होती. तेव्हा पासून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कामगार कल्याण मंडळाने आता एखाद्या विशिष्ट कंपनीला करोडो रुपयाचा प्रीमियम न भरता तीच योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करून राज्यातील व परप्रांतीय नोंदीत कामगारांना दीड लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी कागदपत्राच्या अभावामुळे या योजनेचा लाभ अनेक कामगारांना घेता येत नव्हता. परंतु, आता मंडळाकडील ओळखपत्रावर सुद्धा उपचार होणार आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी माहिती सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)