बांधकाम कामगारांच्या सुरक्षा धोरणाची अंमलबजावणी व्हावी

वाकड – शहरात महापालिकेची अथवा खासगी बिल्डर्सच्या बांधकाम साईटस्‌वर कामगारांच्या अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यासाठी सर्वच बांधकाम मजुरांच्या सुरक्षा विषयक धोरणाची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन केली आहे.

सध्या महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत आचार्य अत्रे सभागृहाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी एका बांधकाम मजुराचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरातील बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्या ठिकाणी सुरक्षेची साधने व उपाय-योजना याकडे पालिका अधिकारी व ठेकेदार सोयीस्कर डोळेझाक करतात. याची किंमत नेहमीच गरीब मजुरांना मोजावी लागते. याकडे महापालिका आयुक्‍तांनी लक्ष घालून बेजबाबदार व नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे.

शहरात खासगी बांधकाम व्यावसायिकांची देखील मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मागील आठवड्यातच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीवरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारचे अपघात सातत्याने होत आहेत. अपघातामुळे कामगाराने जीव गमावल्यानंतर ठेकेदारावर गुन्हा दाखल होतो, मात्र बांधकाम परवाना विभागाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या व कामगारांच्या सुरक्षेची काळजी न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसहित सर्वच यंत्रणांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरीष मोरे, शहर उप अध्यक्ष नाना फुगे, दयानंद करवीर यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)