बांधकाम “एनओसी’ तिढा आता चर्चेच्या टप्प्यात

File pic

महापालिका-सर्वे ऑफ इंडियाची संयुक्त बैठक होणार

पुणे – लष्कराच्या नवीन कलरकोड नकाशामुळे शहरातील नवीन बांधकामे एप्रिल-2018 पासून बंद आहेत. या नकाशानुसार, नव्याने बांधकाम करायचे असल्यास शहराच्या 80 टक्‍के भागांत यापुढे समुद्र सपाटीपासूनच्या ठराविक उंचीचे प्रमाणपत्र सर्वे ऑफ इंडियाचे घेणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत सर्वे ऑफ इंडियाच अनभिज्ञ असल्याने तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका आणि सर्वे ऑफ इंडियाची संयुक्त बैठक होणार आहे.

याबद्दल महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी माहिती दिली. एप्रिल-2018 पासून लष्कराने लागू केलेल्या नवीन कलर कोडनुसार, लोहगाव आणि “एनडीए’च्या प्रस्तावित विमानतळालगतच्या भागातील बांधकामांच्या प्रतिबंधाबाबत भारतीय हवाई उड्डाण वाहतूक मंत्रालयाने लष्करासाठीचा “कलर कोड झोनिंग मॅप’ निश्‍चित केला आहे. हे नकाशे केंद्राने महापालिकेस 2 एप्रिल 2018 रोजी पाठविले आहेत. त्यात पुणे शहर विविध रंगांच्या झोनमध्ये दर्शविले असून लोहगाव आणि खडकवासला येथील “एनडीए’चे विमानतळ “रेड झोन’मध्ये आहे. हे दोन्ही झोन या विमानतळांपासून तब्बल 12 किलोमीटर व्यासाच्या अंतरावर आहेत. त्यामुळे लोहगाव, येरवडा, धानोरी, कळस, वडगावशेरी, खराडी, वारजे, शिवणे, उत्तमनगर, बावधन व कोथरूडच्या काही भागांचा समावेश आहे. त्यामुळे या भागांत कोणत्याही बांधकामास परवानगी देताना लष्कराचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या “रेड झोन’ नंतर “पिंक झोन’ दर्शविण्यात आला असून त्या भागांत कोणतेही इमारतीचे बांधकाम करायचे असल्यास सर्वे ऑफ इंडियाचे समुद्र सपाटीपासून 627 मीटर आणि 637 मीटर उंची मोजणीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

“पिंक झोन’ सुमारे 12 किलोमीटर व्यासाचा आहे. त्यामुळे जवळपास संपूर्ण शहरच या दोन झोनमध्ये येत आहे. परिणामी शहरातील बांधकाम प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यातच, हा केंद्र शासनाचा निर्णय असल्याने राज्य शासन तसेच महापालिकेस त्यात कोणताही बदल करण्याचा अधिकार नाही. असे असतानाच सर्वे ऑफ इंडियाने पालिकेस 14 डिसेंबर 2018 रोजी पालिकेस पाठविले आहे. त्यात लष्कर किंवा महापालिकेकडून अशा कोणत्याही निर्णयाबाबत आम्हांला माहिती दिलेली नाही. तसेच आमच्याकडे काहीच माहिती नाही. त्यामुळे आम्हाला या निर्णयाची माहिती तातडीने कळवावी, असे पत्र उपसंचालक डी. के. सिंग यांनी महापालिकेस पाठविले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही विभागांची संयुक्त बैठक बोलविली आहे. त्यात या कलरकोड नकाशासह, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी तसेच महापालिकेच्या अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे,’ असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)