बांधकाम अभियंत्याला एक तास घेराव

अकोले तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था; राष्ट्रवादीचे आंदोलन
अकोले  –अकोले तालुक्‍यातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने एक तास घेरावो घालण्यात आला, अशी माहिती आ.वैभवराव पिचड यांनी पत्रकारांना दिली. पक्ष कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह अधीक्षक अभियंत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.
अकोले विधानसभा मतदारसंघामधील सर्वच विभागातील रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे आधीच इंधनवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना खड्डयांचा सामना करावा लागतो. मनस्ताप सहन करावा लागतो आहे. विशेषतः कोल्हार-घोटी या प्रमुख राज्यमार्गाची तालुक्‍यातील परिस्थिती अतिशय खराब बनली आहे, असे त्यांनी सांगितले. अकोले तालुक्‍याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात, पिकांची नजर आणेवारी चुकीची लावण्यात आली आहे. ती 50 पैशापेक्षा कमी लावावी व विजेची थकबाकी भरण्याची सक्ती करण्यात येवू नये, याबाबत सोमवारी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून निवेदन देण्यात आल्याची माहिती आ. पिचड यांनी दिली.
या चर्चेमध्ये कोल्हार-घोटी रस्ता, वीरगाव ते गणोरे, शिदवडफाटा-चास ते आंबी, लहित ते ब्राम्हणवाडा, कोतूळ- ब्राम्हणवाडा ते बोटा, पिंपळगांव खांड-पांगरी ते धामणगाव पाट, मार्केटयार्ड ते सुगाव खुर्द, अकोले ते धुमाळवाडी इत्यादी खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. अकोले येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या अपूर्ण कामांसाठी निधी देऊन ते काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा आग्रह या वेळी धरण्यात आला.

शिष्टमंडळामध्ये मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, कैलासराव वाकचौरे, यशवंतराव आभाळे, के. डी. धुमाळ, बाळासाहेब वडजे, राजेंद्र डावरे, सचिन शेटे, विजय सारडा, राहुल देशमुख, विजय पवार, राहुल बेनके, सुभाष बेनके, सोमनाथ मेंगाळ, अरुण शेळके, कैलास जाधव, संपत झडे, संतोष बनसोडे, विजय लहामगे, माधव गभाले, सी. बी. भांगरे, धोंडू सोंगाळ, गंगाराम धिंदळे, रमेश देशमुख, भरत देशमाने, राजेंद्र देशमुख, किसन शिरसाठ, शंभू नेहे, गणेश पापळ, राहुल गोडसे, बाळासाहेब उगले, संतोष आंबरे, सुनील दातीर, प्रकाश पराड आदींचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)