बांधकामांना मिळणार ऑनलाईन परवानगी

पीएमआरडीएकडून प्रणाली सुरू : प्रक्रियेसाठी 250 जणांनी केली नोंदणी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी प्रक्रिया सुकर व पारदर्शक करण्यासाठी “संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली’ सुरू केली आहे. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असून आतापर्यंत बांधकाम परवानगी प्रक्रियेसाठी वास्तुविशारद, अभियंता आणि पर्यवेक्षक अशा 250 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

पीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरीता स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीचा वापर हा सर्वांना वापरण्यायोग्य असा आहे. बांधकाम परवानगीसाठी 75 फाईल्स प्रक्रियेत आहेत. तर, 54 जणांनी आतापर्यंत ऑनलाईन शुल्क भरले आहे. बांधकाम परवानगी पूर्णपणे ऑनलाईन असून यासाठी कोणतीही मानवीय प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया अगदी कमी वेळेत यशस्वीरित्या पार पाडली जात आहे. ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रक्रियेचा वापर सध्या रहिवासी व औद्योगिक वापरासाठी केला जात आहे. लवकरच वाणिज्यिक वापरासाठी प्रक्रिया विस्तारित केली जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

बांधकाम परवानगी नकाशे व बॅंक चलन हे डिजिटल स्वाक्षऱ्यांचा वापर करून केले जात आहेत. तसेच, नागरिकांना ई-मेल आणि मोबाईलवर माहिती दिली जात आहे. या प्रणालीमध्ये “कलर-कोडींग स्कीम’चा वापर आहे. ज्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व चलन ऑनलाईन पद्धतीने भरता येत आहेत. पीएमआरडीएच्या अस्तित्वात असलेला जमीन वापर प्रणालीशी या नवीन बांधकाम परवानगी प्रणालीला जोडण्यात आले आहे.

बांधकाम परवानगी ऑनलाईन प्रक्रिया जलद व सुलभ आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्णपणे युझर फ्रेन्डली आहे. या प्रणालीचा कोणताही लिखित स्वरुपात वापर नाही. त्यासाठी संबंधित नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे.

– किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)