बांधकाममंत्री जी “कभी तो पधारो चिंबळी में’!

चिंबळी- राज्यातील 98 टक्के रस्ते खड्डे मुक्‍त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, चिंबळी फाटा ते चिंबळीगाव या दीड किलोमीटर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बहुधा बांधकामविभास दिसली नसवी, म्हणून नागरिक आता म्हणत आहेत, मंत्रीमहोदय “कभी तो पधारो चिंबळी में’!
चिंबळी फाटा ते चिंबळीगाव या दीड किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून वाहनचालकांना मुरमाड रस्त्यावर तारे वरची कसरत करावी लागत आहे. तर वाहनांमुळे रस्त्यावरील दगड उडून पादचारी जखमी होत असूनही प्रशानस यारस्त्याकडे लक्ष देत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. अनेक दुचाकीस्वारी रात्रीच्यावेळी या रस्त्यावर असलेल्या चढावर वाहन घसरून अपघातग्रस्त होत आहेत.
चिंबळी फाट्यावरुन चिंबळी गावठाणकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या जैद पाटील उद्योगनगरी परिसरात चढावर असलेला रस्ता पूर्णपणे उखडला असून दगडांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावरील साईड चर खोदकाम करण्याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे, तर ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला चर काढण्याबाबत निवेदन दिले आहे. यामुळे नक्की कोणी कोणाला निवेदन दिले आहे याबाबत संभ्रम असून ही फेकाफेकी थांबवून रस्त्याचे काम सुरू अशी आर्तहाक नागरिकांनी दिली आहे.

  • चिंबळीफाटा येथून गावाकडे जाणाऱ्या रत्सावर साकव पुलावर व दोन्ही बाजूच्या चढ उतारावर सिमेंट कॉक्रेटचा रस्ता करण्याचा प्रस्ताव करण्यात येणार असून लवकरच या रत्स्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
    – संतोष पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चाकण

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)