बांग्लादेशने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास 

ढाका : आज बांग्लादेशने ऑस्ट्रेलिया वर मात करत कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. यामुळे  संपूर्ण जगभरातून बांग्लादेशच्या संघावर कौतूकांचा वर्षाव होत आहे. सचिन व सेहवाग यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून बांग्लादेशच्या क्रिकेट खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. कसोटीच्‍या चौथ्‍या दिवशी ऑस्‍ट्रेलियाला विजयासाठी १५६ धावांची गरज होती. ८ विकेट्स शिल्लक होत्‍या. सलामीवीर डेव्‍हीड वॉर्नर आणि कर्णधार स्‍टीव्‍ह स्मिथ नाबाद होते. अशा स्थितीत ऑस्‍ट्रेलियाचा विजय निश्चित होता. परंतु, बांग्लादेशच्‍या गोलंदाजांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला.

मात्र या कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी व्यर्थ ठरली. त्‍याला ११२ धावांवर शकिब अल हसनने पायचित केले. जॉश हॅझलवूडला बाद करुन बांग्लादेशने २० धावांनी ऐतिहासिक विजय साकारला. शकिब अल हसनने पहिल्‍या डावात ८४ धावांची मोलाची खेळी केली. त्‍यासोबतच सामन्‍यात त्‍याने १० बळी घेतले. त्‍यामुळे तो सामनावीर ठरला.

 

धावफलक 

बांग्लादेशने पहिल्या डावामध्ये २६० धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाने अवघ्या २१७ धावांत गारद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)