बांगला देशी दहशतवादी संघटना जेयूएमचा भारताला धोका 

कोलकाता (पश्‍चिम बंगाल): बांगला देशात बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जेयूएम भारतासाठी धोकादायक बनू पाहत आहेत. पश्‍चिम बंगालच्या माल्दा जिल्ह्याला लागून असलेल्या बांगला देशातील नवाबजंग येथे जेयूएमच्या 17 संशयित दहशतवाद्यांना एकाच वेऴी अटक केल्याच्या वृत्ताने सुरक्षा दलांची चिंता वाढवलेली आहे. हे दहशतवादी भारतात घूसखोरी करण्याच्या तयारीत होते. पश्‍चिम बंगालच्या सीमावर्ती भागात जेयूएमने आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
.
एनआयए ने पश्‍चिम बंगाल आणि आसामच्या विविध भागातून जेएमयूच्या एकामागून एक सुमारे दोन डझन दहशतवाद्यांना अट्‌क केली आहे. या दहशतवाद्यांवर लाखोची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली असून बांगला देशातही ते “मोस्ट वॉंटेड’ दहशतवादी आहेत. या दहशतावाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून रॉकेट लॉंचर्ससारखी हत्यारे जप्त करण्यात आली होती. अशा हत्यारांची निर्मिती ते येथेच करत असल्याची धक्‍कादायक माहितीही उघड झाली होती. बांगला देशात सत्तापालट करण्याबाबत त्यांची कटकारस्थाने चालू होती.
एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) जारी करण्यात आल्यानंतर चालू झालेले राजकारण पाहता अशा संधीचा फायदा घेण्याचा जेएमयू करणार यात काही शंका नाही. त्यासाठी त्यांच्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)