बांगला देशात निवडणुकीपूर्वी दहा तास इंटरनेट सेवा बंद

ढाका (बांगला देश): बांगला देशात निवडणुकीपूर्वी तीन दिवस इंटरनेट सेवा दहा तासांसाठी बंद ठेवण्यात आली होते. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळपर्यंत सुमारे दहा तास बांगला देशातील इंटरनेट सेवा बंद होती. बांगला देशातील टेलिकॉम नियामक मंडळ बीटीआरसी (द बांगला देश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशन) ने चार मोबाइल ऑपरेटर्सना 3 जी, 4 जी सेवा बंद करून इंटरनेट स्पीड कमी करण्याचा आदेश दिला होता.

शुक्रवारी सकाळी बीटीआरसीने आदेश दिल्यानंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. 30 डिसेंबर रोजी बांगला देशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान शेख हसीना यांना चौथ्या वेळी सत्ता काबीज करण्याची अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, म्हणून बीटीआरसीने इंटरनेट गेटवेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. फेसबुकसारख्या साईट्‌सचा निवडणूक काळात ” फेक न्यूज’ पसरवण्यासाठी वापर झाला, तर त्यांना “ब्लॉक’ केले जाईल आणि मोबाइल इंटरनेटवरही बंदी घालण्यात येईल, असे यांनी परखडपणे बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)