बांगलादेशी हिंदुंना भारतात नागरीकत्व द्या

अमेरिकेतील भारतीयांच्या संघटनांची मागणी

वॉशिंग्टन: नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर मधून ज्या बांगला देशी हिंदुंची नावे वगळली गेली आहेत त्यांच्यावर पुन्हा बांगलादेशात परत जावे लागण्याचा धोका आहे त्यामुळे त्या हिंदुंना भारत सरकारने प्राधान्याने भारतातच नागरीकत्व दिले पाहिजे अशी मागणी अमेरिकेतील भारतीय नागरीकांच्या विविध संघटनांनी केली आहे. सिंग वाहिनी अमेरिका, ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन, नवबंग अशा संघटनांनी एकत्रितपणे आज येथे हे निवेदन प्रसिद्धीला दिला आहे.

बांगलादेशात हिंदुवर प्रचंड अन्याय आणि अत्याचार होत असून त्यांना तेथे धार्मिक द्वेष सहन करावा लागत आहे. त्यातून स्वताचे जीव वाचवण्यासाठी हे हिंदु भारतात येत आहेत त्यांना तेथे प्राधान्याने नागरीकत्व दिले पाहिजे अशी या संघटनांची मागणी आहे. केवळ बांगलादेशच नव्हे तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदुंवरही इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनांकडून अलिकडच्या काळात मोठे हल्ले आणि त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांच्यावर धर्मांतराचीही सक्ती केली जात आहे असे या संघटनांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)