बांगलादेशी दहशतवादी महाराष्ट्रात, देशालाही धोका

मुंबई – एटीएसन गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिलेल्या माहितीच्या आधारे मंडल यास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून आणखी चार साथीदारांची नावे पुढे आली. मंडल हा गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात राहत आहे. तो एबीटीशी संबंधित सदस्यांना मदत करत होता.

बांगलादेशने 2016 मध्ये बंदी घातलेल्या एबीटीचे देशभरात आणखी काही मॉड्युल सक्रिय असल्याचेही सांगण्यात येते. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा संघटनेकडून प्रेरणा घेत ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनपेक्षा सक्षम असून बॉम्ब बनविण्याचे त्यांनी कौशल्य आत्मसात केल्याचे समजते. एबीटीची पाळेमुळे राज्यात आणखी किती पसरली आहेत, याचा तपास केला जात आहे. यासाठी गुप्तचर यंत्रणा, एनआयएसह अन्य राज्यांमधील एटीएस पथकांचेही सहाय्य घेतले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)