बांगलादेशात शेख हसिना पुन्हा एकदा सत्तेवर !

ढाका: बांगलादेशात पुन्हा एकदा शेख हसिना यांचे सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर आले आहे. शेख हसिना यांच्या नेतृतृत्वाखालील सरकारला 300 पैकी तब्बल 288 जागा मिळाल्या असून विरोधी पक्षांना केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे.बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने अधिकृतपणे आज सोमवारी हे निकाल जाहीर केले.

बांगलादेश नॅशनल पार्टी ही त्या देशातील प्रमुख विरोधी पार्टी आहे. या पार्टीने अन्य पक्षांशी आघाडी करून जातीय ओईक्‍य फ्रंट म्हणजेच नॅशनल युनिटी फ्रंड ही आघाडी स्थापन केली होती त्यांना केवळ सात जागा मिळाल्या असून त्यांचा साफ धुव्वा उडाला आहे. अन्य पक्षांना केवळ तीन जागा मिळाल्या. एका मतदार संघातील उमेदवाराच्या निधनामुळे तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)