बांगलादेशात पुन्हा भूस्खलन

ढाका – बांगलादेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने विविध भागात भूस्ख्लन झाले. या भूस्खलनात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी बांगलादेश मधील खाग्राछारी आणि मौलाविबाजार या जिल्ह्यांत झाली. खाग्राछारी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलानात मृत्यू पावलेल्या तिघांमध्ये दोन लहान भावंडाचा समावेश आहे.तर आणखी दोघे जखमी झाले. काही दिवसापूर्वी झालेल्या भूस्खलनात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला होता. नुकत्याच झालेल्या भूस्खालानामुले बरेच नुकसान झाले आहे. बांगलादेश सरकारच्या वतीने मदत व बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे.
बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. भूस्खलनाच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमधील 10 लोक हे बंदरबन, तर आठ जण चिटगावातील आहेत. भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जास्त करून महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनात अनेक घरे नेस्तनाबूत झाली असून, बचावकार्य राबवणारे कार्यकर्तेही चिखलात फसले आहेत.
भूस्खलनाच्या अशा घटना टाळण्यासाठी आणि डोंगराजवळ राहणा-या लोकांचं तातडीनं समिती स्थलांतर करणार आहे. गेल्या महिन्यातच बांगलादेशाला मोरा या चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. या चक्रीवादळानं बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. त्यावेळी 8 जणांचा मृत्यूही झाला होता. तत्पूर्वी 2010मध्ये बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात झालेल्या भूस्खलनच्या घटनेमुळे जवळपास 53 लोकांना जिवानिशी जावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)