बांगलादेशातील निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली 

ढाका  – विरोधकांच्या मागणीनुसार बांगलादेशातील निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणुका आठवडाभराने पुढे ढकलून त्या 30 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापी या निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विरोधकांनी पुन्हा केली होती ती मागणी मात्र निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे बांगलादेशात येत्या 30 डिसेंबर रोजीच सार्वत्रिक निवडणूका होतील असे आता स्पष्ट झाले आहे.

बांगलादेशातील बहुतेक मोठ्या राजकीय पक्षांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जातीय ओईक्‍य फ्रंट नावाची एक आघाडी उघडली आहे. या आघाडीने निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली होती. बांगला देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्षही या आघाडीचा सदस्य आहे. त्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त नुरूल हुडा यांनी सांगितले की 29 जानेवारी पर्यंत देशात नवीन संसद अस्त्विात येणे आवश्‍यक असल्याने आता या निवडणुका आणखी पुढे ढकलणे अशक्‍य आहे. 300 मतदार संघात ही निवडणूक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)