बहुप्रतीक्षित ‘यंग्राड’ लवकरच होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा आणि त्यांच्या आगळ्या हाताळणीच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच ‘हट के’ चित्रपट ६ जुलै रोजी संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘यंग्राड’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक मकरंद माने यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘यंग्राड’ चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेड) आणि मधु मंटेना (फँटम फिल्म्स) यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘यंग्राड’चे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन करळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, निकिता पवार, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गंगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.
‘यंग्राड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. मराठी सिनेमामध्ये प्रेरणादायी अशी गोष्ट आणि दमदार कथा असतात. त्यांच्या जोडीला कसदार अभिनेत्यांची फळी असते. आम्हाला हे सर्व आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना विशेष आनंद होत आहे,” असे मधु मंटेना यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)