बहुपयोगी जायफळ,जायपत्री 

मिरीस्टिका फ्रॅग्रन्स या वनस्पतीचं पक्‍व आणि सुकवलेल्या बीवरील जाळीदार आवरणास जायपत्री तर आतील भागास जायफळ असं म्हणतात. हिंदी, मराठी, बंगाली आणि गुजराथीमध्ये जापत्री, जायवित्री, जोत्री या नावाने ओळखलं जातं.
आयुर्वेदिक नाव जातीफळ असं आहे. जायपत्री आणि जायफळ या दोन्ही गोष्टी सुकवून बाजारात आणलं जातं. एकाच फळापासून हे दोन पदार्थ तयार केले जातात. हे झाड 9 ते 12 मीटर उंच असतं. ही वनस्पती मूळ मोलकाझ बेटातील असून उष्ण कटिबंधात याची लागवड अधिक होते. यात पायनीन, मिरिस्टिसीन, कम्फेन असे स्वाद आणणारे घटक असतात. जायफळाला गोड, मसालेदार, उग्र गंध आणि तिखट चव असते. तर जायपत्रीला तिखट, कडवट आणि उग्र वास असतो. जायपत्री रंगाने पिवळट करडी किंवा नारंगी रंगाची असते. जायफळाचा उपयोग प्रामुख्याने गोड पदार्थ, मिठाई, गोड मेवा, केक या पदार्थात केला जातो, तर जायपत्री ही प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरली जाते.

जायपत्री आणि जायफळाचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे – 
जायफळ किसून गरम भांड्यात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.
जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.
पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.
निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
अस्थम्याच्या झटक्‍यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून 4-5 वेळा खाल्ल्‌याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.
जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.
अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये 3 ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.
जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.
आयरायटिससारख्या आजारात जायपत्रीचं तेल लावल्यास त्वरित आराम पडतो.
बद्धकोष्ठतेवरही जायपत्री तेलाचा बाह्योपचार केला जातो.
त्वचेवर इसब असल्यास त्यावर जायपत्री तेल अतिशय गुणकारी ठरतं.

जंगली जायफळ 
हा मध्यम आकाराचा (सु.15ु 50 मी. उंच व घेर 0 ु 46 मी.), विभक्‍त लिंगी व सदापर्णी वृक्ष सह्याद्री घाटावरील सदापर्णी जंगलात व कोकण, कारवार, मलबार (310 मी. उंचीपर्यंत) इ. भागांत आढळतो. हा जायफळाच्याच वंशातील असल्याने याची अनेक शारीरिक लक्षणे त्यासारखी आहे. साल गुळगुळीत व हिरवट काळी असून आतील भागात तांबूस रस असतो.

पाने साधी, आयतकुंतसम (भाल्यासारखी) व चिवट असतात. एकलिंगी फुले नोव्हेंबर ते मार्चमध्ये येतात. फळ लांबट, आयत (5-6ु3 द 2ु5-3ु2 सेंमी.), लोमश (केसाळ); बी काळे, चकचकीत, सुरकुतलेले आणि अध्यावरण तांबूस पिवळे, खंडित व जाळीदीर असते. बी एका बाजूस चपटे असते व काळे बाह्यकवच काढून नंतर ते व पत्री चांगल्या जायफळ-जायपत्रीत भेसळ करून बाजारात विकतात.

जंगली जायफळाला व जायपत्रीला रुची आणि वास जवळजवळ नसतात. बियांत 15-16 टक्‍के चरबी असते व तिचे संपूर्ण रासायनिक संश्‍लेषण झाले आहे. जायपत्रीत चरबी व राळ 63ु26 टक्‍के असते; ही चरबी वर वर्णिलेल्या जायफळातल्या प्रमाणे असते. बिया कुटून पाण्यात उकळल्यास पिवळसर घट्ट तेल निघते; इतर कोणत्याही तेलात मिसळून ते पातळ करून औषधी उपयोगात येते. ते जखमांवर लावतात; ते वेदनाहारक असून जुनाट संधिवातावर चोळण्यास चांगले व दिव्यातही जाळण्यास उपयुक्त असते. झाडाच्या सालीपासून किनोफ मिळतो. याचे लालसर तपकिरी लाकूड फारसे टिकाऊ नसल्याने चहाची खोकी, आगपेट्या व आगकाड्या, साधे सजावटी सामान व घरबांधणी इत्यादींकरिता ते उपयुक्त असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)