बहुत जनासी आधारू : आ. मुरकुटे 

“बहुत जनाशी आधारू..’ ही केवळ अतिशयोक्‍ती नाही तर आमदार बाळासाहेब मुरकुटे (दादा) यांच्या आमदार म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याची ही उपाधी आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.. असे सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांना ज्याप्रमाणे लोकमान्य म्हणून लोकमान्यता मिळाली आज या घटनेला बरीच वर्षे उलटून गेली असली तरी समाजासाठी झटणाऱ्या लोकांनाच लोकमान्यता मिळते हा सिद्धांत आहे. सत्य मांडायला नीतिमत्तेचे बळ लागते. लोकमान्यांप्रमाणेच गोरगरीब जनतेचा विकास हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगून सर्वसामान्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे लोकनेते आमदार बाळासाहेब दामोधर मुरकुटे यांना महाराष्ट्रातील जनता अभिमानाने “जय हरी’ म्हणून गौरविते. 

उत्कृष्ट संसदपटू आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना नेवासा तालुक्‍यातील गोरगरीब जनतेने आपला लोकमान्य लोकराजा म्हणून स्वीकारले असून, त्यांनीदेखील आपल्या कार्यकर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे की खरे स्वराज्य म्हणजे काय, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला मिळवून दिल्यानंतरच समजले. त्याचप्रमाणे जनतेचा विकास म्हणजे काय हे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विकासाची चळवळ सुरू करून ती राबवली तेव्हाच सर्वांना समजले. नेवासा तालुक्‍याचा अनेक दिवसांपासूनचा विकास खुंटला होता.

अनेक रस्त्यांच्या, देवस्थान व तालुक्‍यातील अन्य प्रश्न वंचित राहिलेल्या नेवासा तालुक्‍यातील जनतेने “जय हरी’च्या रूपाने एका उमद्या, विकासाने झपाटलेला विकास पुरुष आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना आमदार होण्याची संधी दिली. ज्या जनतेने विश्वासाने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या खांद्यावर मान टाकली त्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रामाणिकपणे केले. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा मापदंड त्यांनी घालून दिला आहे. राजकारणात काही गोष्टी जमवून आणाव्या लागतात, तर काही गोष्टी अचानक जमूनही येतात. असेच काहीसे दूरदृष्टीचे स्वप्न पाहणारे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत घडले आणि आमदार बाळासाहेब मुरकुटे “जय हरी आमदार’ झाले. सध्याच्या विद्यमान सरकारमधील सर्वात सर्वसामान्य (लोकल) आमदार म्हणून अगदी थोड्या दिवसांत त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. 2014 पासून विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे. नेवाश्‍यातील विकासाचा काळ म्हणून 2014 ते आतापर्यंत म्हणावे लागेल. आमदार झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे तालुक्‍यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात “आमदार जय हरी’ची गाडी दिसताच जनता भराभरा गोळा होते.

विधानसभा विजयानंतर आमदार झालेल्या साहेबांनी सुरुवातच दमदार केली आणि वर्षपूर्तीच्या अगोदरच साहेबांना तालुक्‍यातील जनतेने दमदार कामदार आमदार म्हणून अक्षरश: डोक्‍यावरच घेतले. मागील मोठ्या कामाचा बॅकलॉग 2014 पासून आजअखेर त्यांनी तीनच वर्षांत अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 200 कोटी रुपयांचा विकासनिधी आणला, पण काहींना ही आकडेवारी रुचली नाही. मग अशांना वाड्यातून बाहेर पडण्याचे आव्हान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. असे आव्हान देणे “जय हरी’शिवाय कोणालाच जमत नाही आणि जमणारही नाही. विकास काय असतो याचे स्वप्न तालुक्‍यातील जनतेने पाहिले होते. ते सत्यात उतरविण्याचे काम “जय हरी आमदारांनी’ केले आहे. “जय हरी आमदार’ बाळासाहेब मुरकुटे आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत असा एकही दिवस नाही की ते लोकांमध्ये नाहीत. लोकमान्यता मिळायला आमदार मुरकुटेंसारखे कष्ट घ्यावे लागतात.

– गणेश घाडगे पाटील नेवासा 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)