बहुतांश बॅंका स्वतंत्रपणे व्याजदर ठरवितात

नवी दिल्ली – व्याजदर ठरविताना बॅंकात संगनमत नसल्याचा स्पर्धा आयोगाचा निष्कर्ष नवी दिल्ली, दि.25 -देशातील बॅंकांनी बचत खात्यावरील व्याजदर ठरविताना संगनमत केलेले दिसून येत नसल्याचा निर्वाळा स्पर्धा आयोगाने दिला आहे. बॅंकांनी त्यांच्या मालमत्तेचा विचार करून बचत खात्यावरील व्याजदर ठरविले असल्याचे दिसून येते, असे आयोगाने सांगितले आहे.

आयोगाने बऱ्याच बॅंकांच्या मालमत्ता आणि व्याजदरावर विचार केला आहे. त्याचबरोबर व्याजदर ठरविताना बॅंकांच्या संघटनांनी काही हस्तक्षेप केला का याची शहानिशा केली आहे. त्यात काही वावगे आढळून आले नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. याबाबत काही शंका घेतल्यानंतर आयोगाने आपल्या चौकशी विभागाला माहिती घेण्यास सांगितले होते.

-Ads-

चौकशी विभागाने 2011 ते 2016 या काळातील विविध बॅंकांच्या व्याजदराची शहानिशा केली. त्यात साखळी पद्धतीने काम केल्याचे दिसून यते नसल्याचे विभागाने सांगितले. नंतर स्पर्धा आयोगाने चौकशी विभागाचा अहवाल योग्य असल्याचे सांगितले आहे. बहुतांश बॅंकांच्या ताळेबंदाचा अभ्यास केल्यानंतर या बॅंकांनी संगनमत करून व्याजाचे दर ठरविले नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

या काळात भांडवल सुलभतेच्या आधारावरच बॅंकांनी व्याजदर ठरविले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर बॅंका ज्या विविध सेवा देतात त्यावरील सेवा शुल्काची शहानिशा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या बॅंकांचे विविध सेवासाठीचे शुल्क वेगळे केल्याचे दिसून आले आहे. त्या क्षेत्रातही बॅंकांनी संगनमत केल्याचे दिसून येत नाही.

भातातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका योग्य प्रकारे काम करीत आहेत. त्याच्यामध्ये योग्य प्रकारची स्पर्धा आहे. त्यात वावगे असे काही नसल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. त्यामुळे बॅंकांच्या कामकाजाबाबत कसलीही शंका राहिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)