बहुजन क्रांती मोर्चाचे अकोलेत धरणे आंदोलन

अकोले – राज्यात बहुजन मागासवर्गीयांवर होत असलेल्या जातीय अन्याय व अत्याचारांच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने शनिवारी (दि. 30) अकाले तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
वाकडी येथील मातंग समाजातील मुलांची नग्न धिंड प्रकरण, उदगीर येथील मातंग लोकांवरील हल्ला, नारायणगाव येथील कैकाडी जमातीच्या लोकांवरील अत्याचार, पूजा सकट हत्येची चौकशी करावी, चौंडी येथील धनगर कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरण मागे घ्यावे आदी महत्त्वपूर्ण घटनांमधील दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन सायंकाळी आंदोलकांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे सदस्य तसेच भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष साळवे, जिल्हा प्रचारक हर्षद रूपवते, माजी उपसरपंच भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले गेले. यात सत्यशोधक मुलनिवासी वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल महाराज तळपे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, वैदू संघटनेचे नेते रणजीत शिंदे, कॉंग्रेस युवक शहराध्यक्ष निखिल जगताप, नगरसेवक सुरेश लोखंडे, पत्रकार पांडुरंग पथवे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष राजू गवांदे, रिपाइं तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, रिपाइं गवई गट तालुकाध्यक्ष राजेंद्र घायवट, गोरख शिरकांडे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर वैराट, गोपीनाथ साळवे, संजय शिंदे, रावसाहेब वाघमारे, बाळू खाडे, बाळासाहेब साळवे, आयाज पठाण, हैदर पठाण, दलित महासंघाच्या तालुकाध्यक्ष भीमाबाई खरात, भारत मोर्चाचे राजू गुरुकुले, मन्सूर सय्यद, संतोष जगताप, प्रसाद गवांदे, सलीम पठाण, परवेज शेख, गोरख हासे, प्रशांत जगताप, संदीप वाकचौरे, रणजीत खैरे, विशाल वैराट, शशिकांत सरोदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह प्रकाश साळवे, दिनकर साळवे, किसन अवचिते, विजय साळवे, शरद साळवे, नीलेश लांडगे, राहुल वेताळ, महेश शिंदे, ऋषिकेश गाडेकर, गीताबाई अवचिते, विजय साळवे, संगीता साळवे, सुमन गायकवाड, सीताबाई खरात, सखुबाई शिंगवान, प्रशांत अवचिते, हेरंब गायकवाड, सागर अवचिते आदी असंख्य कार्यकर्ते तसेच अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)