बहुगुणकारी ऊस…

महाराष्ट्रात उसाची लागवड सर्वात जास्त आहे. अनेक साखर कारखाने खाजगी आणि सहकारी तत्वावर चालतात. नगदी पिकामध्ये उसाचा समावेश होतो. उसाच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये साखरेसाठी, गुळासाठी, गुऱ्हाळासाठी अशा वेगवेगळ्या जातींच्या उसांची लागवड केली जाते. बेणे तसे शेतकरी निवडतात. फार पुरातन कालापासून उसाचा उपयोग साखर आणि गुळासाठी केला जातो. तसे उसाचे अनेक आयुर्वेदीय उपयोग आहेत.

शक्‍तीवर्धक – उसाचा रस आजारी माणसाला बरा करण्यासाठी टॉनिक म्हणून दिला जातो. ऊसामध्ये साखरेचे प्रमाण असल्यामुळे साखर ही नैसर्गिकरित्या रसातून शरीराला मिळते. त्यामुळे शरीर मजबूत होते.

दातांच्या व हिरड्यांच्या बळकटीसाठी – ऊस तोडून दाताने चावून-चावून खाल्ला असता दात मजबूत होतात. हिरड्या कणखर होतात.

मूत्रविकारावर – लघवीस साफ होत नसेल, लघवीचे वेळी आग होत असेल तर नुसता ऊसाचा रस प्यायल्याने लघवीस साफ होऊन सर्व मूत्र विकार थांबतात. ऊसाच्या मुळांचा काढा तृणपंचमुळांतील गुणकारी औषध आहे, जो घेतला असता अनेक मूत्रविकार बरे होतात.

काविळीवर – उसाचा मोठा औषधी उपयोग म्हणजे तो काविळी बरी करण्याचे महत्त्वाचे काम करतो.ज्याला कामला म्हणजेच काविळ ज्यात डोळे व सर्व अंग पिवळे होते तो विकार असेल त्याने खावा, रात्री घराच्या आढ्यावर ऊस टाकून ठेवावा व सकाळी खावा.चार दिवसात कामला म्हणजेच काविळ कमी होते.

पित्तविकारावर – ऊस जेवणापूर्वी खाल्ला असता पित्त शमवितो, रोज रात्री ऊस आणून तो सकाळी खावा. उसाचा रस उन्हात तापवून अगर उकळी आणून बरणीत भरून ठेवतात. व्हीनीगरचे गुणधर्म या शिरक्‍यात नक्‍कीच मिळतात.
अशाप्रकारे ऊस हा गुणकारी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)